कलम 44ऄई ची अंदाजित उत्पन्नाची योजना प्रवासी वाहतूक किंवा जेसीबी ला लागू होत नाही

Vyaparimitra    01-Oct-2019
प्रश्न:
माझा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय आहे. माझ्या मालकीच्या 6 बसेस आहेत. तसेच माझ्या दुसर्‍या फर्ममध्ये जेसीबी भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. आयकर कलम 44ऄई ची अंदाजित उत्पन्न योजनेची तरतूद माझ्या व्यवसायांना लागू होईल का?
 
उत्तर: आयकर कलम 44ऄई अंतर्गत गृहित उत्पन्न योजना ही माल वाहतूक गाडीसाठी लागू आहे. आर्थिक वर्षात करदात्याच्या मालकीच्या 10 पेक्षा जास्त गाड्या असू नयेत अशी त्यासाठी अट आहे. आकारणी वर्ष 2019-20 पासून जड माल वाहतूक गाड्यांच्या बाबतीत (12 मे. टनपेक्षा जास्त ढोबळ वजन असणार्‍या) गाडीच्या ढोबळ वजनानुसार किंवा माल न भरलेल्या गाडीच्या वजनाच्या एक हजार रुपये प्रतिटन प्रतिमहिना किंवा त्याचा भाग किंवा करदात्याचे खरे उत्पन्न जे जास्त असेल ते इतके गृहित धरण्यात येईल. जड माल वाहतूक गाड्या सोडून इतर गाड्यांसाठी रु. 7500 प्रत्येक गाडीसाठी प्रतिमहिना किंवा त्याच्या भागासाठी अशी योजना आहे. कलम 44ऄई ची तरतूद माल वाहतूक गाड्यांना लागू आहे. प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करणार्‍या किंवा जेसीबीचा व्यवसाय करणार्‍यांना कलम 44ऄई ची तरतूद लागू होत नाही.