मान्यतेवर मालाचा पुरवठा केल्यास, इनव्हॉईस देण्याची तरतूद

Vyaparimitra    14-Nov-2019

invocie_1  H x  
प्रश्न: मालाचा मान्यतेवर (On Approval Basis) पुरवठा केला तर त्या बाबतीत प्राप्तकर्त्याला इनव्हॉईस केव्हा द्यावा लागेल?
 
उत्तर: सीजीएसटी कायद्याचे कलम 31(7) मधील तरतुदीप्रमाणे मालाचा पुरवठा मान्यतेवर केला असेल, तर अशा परिस्थितीत माल हलविण्याच्या वेळी त्याबाबतीत इनव्हॉईस द्यावे लागत नाही. कारण त्यावेळी पाठविलेल्या मालाचा पुरवठा होईल असे निश्चित नसते. प्राप्तकर्त्याने मान्यतेवर घेतलेल्या मालाच्या बाबतीत माल घेण्याच्या बाबतीत होकारार्थी (Confirmation) दिल्यावर त्याबाबतीत टॅक्स इनव्हॉईस द्यावॆ लागतॆ. मान्यतेवर माल पाठविल्यावर सहा महिन्याचे आत त्याबाबतीत पुरवठा झाला नसेल, किंवा मान्यता मिळालेली नसेल तर, त्याबाबतीत सहा महिने संपल्यावर त्याचे लगेचच्या दिवशी टॅक्स इनव्हॉईस दिले पाहिजे.