सक्सेसफुल स्टार्टअपची सिक्रेट्स!

Vyaparimitra    15-Nov-2019
|

 
लेखक श्री. विनय कवठेकर, व्यावसायिक आणि स्टार्टअप कन्सल्टंट आयटी क्षेत्रातील अठरा वर्षांचा अनुभव, दोन स्टार्टअप्स मध्ये को फौंडर म्हणून काम चालू. ऑनलाईन मार्केटिंग विषयातील तज्ञ. अनेक स्टार्टअप करिता मार्गदर्शन केले आहे. स्टार्टअप सुरू करताना प्राथमिक कोणती माहिती गोळा करणे जरूरीचे आहे यासंबंधी व येणार्‍या अडचणी कशाप्रकारे सोडवाव्या यासंबंधी महत्त्वाची मुद्देसूद महिती दिली आहे.
 
कोणताही बिझिनेस अथवा स्टार्टअप आपण का सुरु करतो ? भरपूर पैसे कमवायचे आहेत म्हणून ? काही तरी व्यवसाय करायचा आहे म्हणून ? नोकरी करायचा कंटाळा आलाय म्हणून ? की खरोखरच आपली आवड, ज्ञान, कौशल्य, अनुभव सर्व एकत्र आणून आपण उत्तमरित्या व्यवसाय करू शकतो असा आपल्याला ठाम विश्‍वास वाटतो म्हणून ? यातील शेवटचा पर्याय हेच आपलं उत्तर असेल तर आपला स्टार्टअप नक्की यशस्वी होेऊ शकतो. परंतु आपण सर्वजण हे जाणतो की, कोणतीही गोष्ट सहज-सोपी नसते, त्यामध्ये अडथळे हे येतातच. पण ते कमी करण्याचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो. त्यासाठी लागणार्‍रा काही महत्वाच्या गोष्टी आपण येथे पाहूयात. कोणतीही गोष्ट चांगली जमून येण्याकरिता त्यातील बारकावे समजून घेणे आवश्यक असते. स्टार्टअपचेही तसेच आहे. यातील प्रत्येक गोष्ट, त्याचा क्रम, त्याचं महत्व हे आपण येथे समजावून घेऊ.
 
1. बिझनेस आयडिया
 
ही स्टार्टअपची महत्वाची पहिली पायरी. तुमची आयडिया ही युनिक आणि क्रिएटिव्ह असायला हवी. कोणताही निर्णय उतावळेपणाने न घेता शांतपणे व अभ्यासपूर्वक घ्यायला हवा. सर्व बाजूने विचार करून खोलवर जाऊन आपली बिझनेस आयडिया तयार व्हायला हवी. संबंधित क्षेत्रातील किमान दहा तज्ञांबरोबर आपण आपल्या बिझनेस आयडीयावरती चर्चा करायला हवी. यामधून आपल्याला अनेक नवीन गोष्टी कळतील. त्यातील संभाव्य धोके, आजची आणि भविष्यातील त्याची गरज, स्पर्धा आणि यासारखी बर्‍राच प्रकारची माहिती आपल्याला पुढचे निर्णय घ्यायला कामी येऊ शकते.
 
2. मार्केट रिसर्च
 
मार्केट रिसर्च फार महत्वाचा असतो. आपल्या उत्पादन किंवा सेवा संदर्भातील चालू आणि भविष्यातील कल (ढीशपवी) समजणे आपल्या व्यवसायासाठी आवश्यक आहे. व्यवसाय सुरू करतानाच नाही तर चालू असतानाही त्याचा प्रचंड फायदा होतो. ती वन टाइम अ‍ॅक्टिव्हिटी नसून नित्य प्रक्रिया आहे. तुमच्या उत्पादनाची अथवा सेवेची गरज ओळखण्याचं अचूक काम यामध्ये होतं. यामध्ये आपण ऑनलाईन फ्री किंवा पेड सर्व्हे करून डेटा गोळा करू शकता. मॅनेजमेंट स्कूल मधील इंटर्नस हायर करून आपण कमी किंमतीत फिजिकल सर्व्हे सुद्धा करून घेऊ शकता.
 
3. पार्टनर /को-फाउंडर
 
तुमच्या पार्टनरची किंवा को-फाऊंडरची निवड योग्य असणे आवश्यक आहे. तो तुमच्या प्रत्येक निर्णयात कायम तुमच्या बरोबर असायला हवा. इतकेच नव्हे तर तुम्ही जबाबदारी वाटून घेऊन एकमेकांची बांधणी करत पुढे जायला हवे. शक्यतो तुमचे कामाचे क्षेत्र वेगवेगळे असावे जेणेकरून एकमेकांच्या कामामध्ये ढवळाढवळ होणार नाही आणि प्रॉडक्ट/सर्विसची क्वालिटीही उत्तम राहील.
 
4. प्रॉडक्ट प्लॅनिंग
 
कोणतेही प्रॉडक्ट तयार करण्यापूर्वी आणि त्यामध्ये पूर्णपणे पैसे गुंतवण्यापूर्वी तो मार्केटमध्ये टेस्ट करून पहावा. त्याचे प्रोटोटाइप, सॅम्पल किंवा माहिती घेऊन किमान 15 ते 20 ठिकाणी स्वत: जाऊन यावे. यातून तुम्हाला प्रॉडक्ट किंवा सर्विसची गरज, त्याची किंमत, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, बिझनेस व्हाल्युम अशा बर्‍राच गोष्टींचे पृथ:करण (अ‍ॅनालिसिस) करता येऊ शकेल आणि अधिक चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट योग्य पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये आणू शकाल.
 
5. फंडिंग
 
नवीन बिझनेस साठी लागणारी पैशाची गुंतवणूक स्वत: करू नका. परंतु थोडेफार पैसे गुंतवायला हरकत नाही. वर दिलेल्या चारही प्रक्रिया तुम्ही योग्य रीतीने पार पाडल्यावर तुम्हाला गुंतवणुकीच्या योग्य रकमेचा अंदाज येईल. एकदा खात्री पटल्यावर आणि आत्मविश्‍वास आल्यावर तुम्ही काही मित्र आणि नातेवाईक यांना विश्‍वासात घेऊन सीड कॅपिटल गोळा करू शकता. यालाच क्राऊड फंडिंग असेही म्हणतात. फंडिंगचे वेगवेगळे टप्पे असतात - सीड कॅपिटल, एंजल इन्व्हेस्टमेंट, व्हेंचर कॅपिटल. आपल्या बिझनेसच्या आवश्यकतेनुसार आपण पर्याय निवडू शकतो. परंतु हे फंडिंग मिळवण्यासाठी भरपूर श्रम करण्याची तयारी हवी. त्यासाठी योग्य पद्धतीने फंडर्स प्रझेंटेशन तयार करावे लागते. आपल्याला आवश्यक असलेले सर्व फंडिंग एका टप्प्यात मिळत नाही. बिझनेस वाढीच्या आणि खर्चाच्या प्रमाणात त्याचे वाटप केले जाते. ते पैसे तुम्हाला व्याजावर किंवा इक्विटी शेअर करून मिळू शकतात. जर आपला बिझनेस स्टार्टअप इंडिया योजनेखाली रजिस्टर केलेला असेल तर आपण सरकारच्या मुद्रा लोन साठी अर्ज करू शकता. त्यामध्ये 50 हजार ते 10 लाख रुपये आपल्याला व्यवसायासाठी उपलब्ध होऊ शकतात. महत्वाचे म्हणजे फंडिंगचा प्रश्‍न मार्गी लावल्याशिवाय पुढे जाऊ नये. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोके टळतील आणि बिझनेसवरचा फोकस टिकून राहील. 
 
6. रेव्हेन्यू मॉडेल
 
तुमच्या बिझनेसच्या कम्प्लीट प्रोसेस मधून तुमचे रेव्हेन्यू मॉडेल तयार होते. ही प्रोसेस फिक्स झाल्यानंतर तुम्हाला किती विक्री होणार याचा अंदाज येऊ शकतो. त्यावरून तुम्ही तुमचे टार्गेट आणि प्रोजेक्शन सेट करू शकता. रेव्हेन्यू मॉडेल तयार करताना रेव्हेेन्यूच्या वेगवेगळ्या अन्य मार्गांचाही विचार करून ठेवायला हवा. काही वेळेस उत्पन्नाचे बरेच मार्ग दिसतात, तरीही सर्वच गोष्टींच्या मागे एकाच वेळेस धावू नये. एक किंवा दोनच खात्रीशीर मार्ग निवडून त्यावर लक्ष केंद्रित करावे व बाकीचे प्लॅन वेगवेगळ्या फेजेस करून बाहेर काढावेत. जेणेकरून बिझनेसला स्थिरता मिळेल आणि कायम काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्ट मार्केटमध्ये आणता येऊ शकेल.
 
7. आऊटसोर्सिंग
 
बिझनेस म्हटल्यावर त्यामध्ये बर्‍राच प्रक्रिया येतात. परंतु सर्वच गोष्टी इन हाऊस करण्याचा आग्रह असू नये. प्रत्येक कामासाठी आज मार्केटमध्ये एक्स्पर्टस उपलब्ध आहेत. गरज वाटेल तिथे त्यांचा वापर अवश्य करून घ्यावा. यामुळे प्रत्येक गोष्टीत उत्तम दर्जाचे काम मिळू शकेल आणि उत्तम प्रॉडक्ट तयार होईल. यामध्ये मार्केट रिसर्चपासून प्रॉडक्ट तयार करणे, त्याचे ब्रँडिंग, मार्केटिंग, लीगल, फायनान्स या व अशा इतर अनेक गोष्टींचा समावेश होऊ शकतो.
 
8. कंपनी फॉरमॅलिटीज
 
नवीन बिझनेस करायचं ठरलं की आपण लगेच बिझनेसचे नांव ठरवून कंपनी फॉर्म करून टाकतो. बघायला गेलं तर कंपनी सुरु करताना, चालू असताना आणि इतकंच नाही तर बंद करताना सुद्धा बर्‍राच फॉर्मेलिटीज कराव्या लागतात. खर्चही बर्‍रापैकी होतो. कंपनीची गरज आपल्याला फंडिंग मिळवताना किंवा आपलं प्रॉडक्ट विक्रीसाठी मार्केटमध्ये आणताना भासते. तेव्हां आपल्या बिझनेसची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी उर्वरित अन्य गोष्टींची पूर्तता झाल्याची खात्री करूनच कंपनीच्या फॉर्मेलिटीज सुरू कराव्यात. शक्यतो चार्टडर्र् अकाउंटंटची नेमणूक सुरुवातीलाच करावी जेणेकरून त्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहील.
 
9. लीगल
 
हा भाग अत्यंत महत्वाचा असून याकडे दुर्लक्ष करू नये. बिझनेसच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये आवश्यक तिथे कायदेशीर सल्ला घेणे फायदेशीर ठरते. कंपनीच्या पॉलिसीज, कॉन्ट्रॅक्ट, कॉपीराईट्स ह्या महत्वाच्या कायदेशीर बाबी असून त्याचे उल्लंघन खूप महागात पडू शकते. याकरिता कायदेशीर सल्लागार नेमणे योग्य ठरेल.
 
10. ब्रँडिंग आणि मार्केटिंग
 
आपल्याला बिझनेसचे ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग इफेक्टिव्ह असायला हवे. आपलं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस हे कितीही चांगले असले तरी ते योग्य व्यक्तींपर्यंत योग्य रितीने पोहोचत आहे हे पाहणे महत्वाचे असते. याकरिता मार्केटिंगची आणि सेल्सची जबरदस्त धोरणे तयार करावी लागतात. चांगल्या व अनुभवी एजन्सीकडे हे काम आपण सोपवू शकतो. आकर्षक ब्रँड लोगो, ब्रोशर, मार्केटिंग प्रेझेन्टेशन, उत्तम वेबसाईट आणि ऑनलाईन मार्केटिंग ह्या यातील काही महत्वाच्या गोष्टी. ही सव्हिर्र्स थोडी खर्चिक वाटली तरीही बजेटिंग करताना याचा प्रामुख्याने विचार करावा. आजच्या काळात याला पर्याय नाही.
 
स्टार्टअप बद्दलचे काही प्रमुख मुद्दे येथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या दहा गोष्टींची अंमलबजावणी आपण आपल्या बिझनेसमध्ये योग्य रीतीने केल्यास आपले व्यवसायातील यश नक्की आहे. फक्त दहा टक्के स्टार्टअप्स यशस्वी होतात तेही याच गोष्टींमुळे. बिझनेस स्थिरावून चांगल्यापैकी प्रॉफिट मिळवून देण्याकरिता किमान तीन ते पांच वर्षांचा कालावधी विचारात घ्यायला हवा. स्टार्टअप बद्दल अधिक तपशीलवार माहिती जाणून घेऊ इच्छिणार्‍रा मंडळींनी प्रस्तुत लेखकाशी संपर्क साधल्यास त्यांना मार्गदर्शन करण्यास नक्की आवडेल.
 
श्री. विनय कवठेकर