शतायुषी होण्यासाठी हे करून पहा

Vyaparimitra    28-Aug-2019
|

  
 • शक्य असल्यास जेवणापूर्वी आल्याचा रस, लिंबू व शेंदेलोण (सैंधव मीठ) घालून घ्यावा. याने जठराग्नी प्रदीप्त होतो. जेवणात आल्याचा कीस कोशिंबिरी सोबत खावा. भाजीत, सॅलडवर लिंबू पिळावे. जेवणानंतर एक वाटी ताक, हिंग, मीठ घालून प्यावे याने पचन चांगले होते.
 • सतत चमचमीत व मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. ते शरीराला नुकसानकारक असतात. अति तिखटही खाऊ नये. शिजवलेल्या अन्नात वरून मीठ घालू नये.
 • कच्च्या भाज्या अवश्य खा. काकडी, शेपू, मुळा, बीट, कांदा, आले, लसूण, कांदेपात वगैरे भाज्या कच्च्या खाव्यात. मोड आलेली कडधान्रे खावीत. त्रातून विटॅमिन बी मिळते. मोड आलेल्रा कडधान्रांसारखे दुसरे टॉनिक नाही.
 • ॠतुप्रमाणे फळे खावीत. आंबे, पपई, जांभूळ, कवठ, लिंबू, सफरचंद, टरबूज, खरबूज, नारंगी इ. फळे सकाळी खावीत.
 • चुना हाडांसाठी व शरीराच्या घडणीसाठी आवश्यक आहे. त्यातून कॅल्शियम मिळतं म्हणून पानाला चुना लावून जेवणानंतर पान खावे. दूध, फळे व भाज्या यातूनही कॅल्शियम मिळते. म्हणून याचा उप आहारात सढळ हाताने करावा.
 • साखरेचा उपरोग आहारात कमीत कमी करावा. साखरेत कोणतेही पोषक तत्व नाही. याऐवजी मध, गूळ, सुका मेवा, ग्लुकोज, ताडाचा गूळ वगैरेचा वापर करावा.
 • सकाळी चहा-कॉफी घेण्यापेक्षा गरम पाण्यात लिंबू व गूळ घालून प्या. तुळशीचा काढा प्या.
 • पोट साफ राहण्यासाठी आसने करा.
 • बद्धकोष्ठ टाळण्यासाठी हरडे घ्या.
 • सकाळीे उठल्यावर संडासला जाण्याची सवय लावून घ्या.
 • चवीसाठी खाऊ नका तर जे खायचे व पोषणापुरतेच खायचे नक्की करा.
 • काम संपवूनच जेवण करा. जेवणानंतर विश्रांती घ्या. जेवल्या-जेवल्या कामं करू नका.
 • हलकया पोटामुळे शरीरात स्फूर्ती व काम करायचा जोर असतो.
 • जेवणात फ्रूट सॅलड खाणे, संधिवात असलेल्यानी श्रीखंड, दहीवडे, आंबवलेले पदार्थ इ. खाणे हे सर्व कुपथ्य आहे. दूध व फळे एकत्रित कधीच खाऊ नरेत.
 • यथाशक्ती आसने केल्राने शक्ती कायम राहते. शीर्षासन व सर्वांगासन केल्याने सर्व अवयवांना रुधिराभिसरणाची गती वाढल्याने आरोग्य प्राप्त होते.
 • चालणे व धावणे या कसरती म्हणजे निर्दोष व्यायाम प्रकार आहेत. रोज 30 ते 40 मीटर धावण्याचा व्यायाम करा. धावण्याने आयुमर्यादा वाढते. मेद वाढत नाही. पोटाचा घेर कमी होतो. वजन कमी होते. यकृत व जठर शक्तिशाली होतात. हृदय रोग, लघवीमधून साखर जाणे, रक्तदाब, संधिवात यासारखे रोग होत नाहीत.
 • खूप थकवा आला असेल, खूप काम करून कंटाळा आला असेल तर व्यायाम न करता विश्रांती घ्या. आजारी व्यक्तीला विश्रांती मिळणे आवश्यक आहे.
 • श्‍वास नेहमी नाकाने घ्या. नाकातील केसांमुळे बाहेरील हवा गाळून स्वच्छ होऊन फुफ्फुसात जाते. त्यामुळे साथीचे रोग होत नाहीत. फिरताना गप्पा मारत चालू नये. तोंड बंद ठेवावे. म्हणजे हवेतील जंतु फुफ्फुसात जाणार नाही.
 • निवृत्त झाल्यावर काहीच काम करत नसाल तर सारा दिवस बसून रहायचे असेल तर आराम खुर्चीवर बसा किंवा झुलत्या खुर्चीवर बसा. खुर्ची पुढे-मागे हलल्याने रुधिराभिसरणाला मदत होते.
 • डोकयाला तेल लावताना हळुहळू लावा. रोज कान, नाक, डोळे, हनुवटी, मान याना मसाज करा किंवा थापट्या मारा याने स्मरणशक्ती वाढते. कानाला रेणारी बधिरताही येत नाही.
 • डोळ्यांवर थंड पाणी शिंपडा. दिवसातून 2-3 वेळा तरी असे करा. तसेच रात्री झोपण्रापूर्वी डोळ्यांवर थंड पाणी मारा व मग झोपा.
 • गरज नसेल तेव्हा डोळे उघडे ठेवू नका. जेवणानंतर विश्रांती घेतेवेळी, प्रवास करताना, गप्पा मारताना डोळे बंद ठेवण्याचा प्रयत्न करा. बंद डोळे शक्तीप्रदाता आहेत.
 • चिंतेला दूर ठेवून शांत व प्रफुल्ल चित्ताने भोजन करा. आनंदाने, हसत-खेळत मुलांशी थट्टामस्करी करत जेवा, एकटे चिंता करत, कटकट चालू असताना जेवल्यास पचनशक्तीवर याचा विपरित परिणाम होतो.
(सा. बेळगाव समाचार वरून साभार)