धंदा किंवा व्यवसायापासूनचे पुढे ओढलेले नुकसान पुढील वर्षातील अन्य स्त्रोतापासूनच्या उत्पन्नातून वजा (सेटऑफ) मिळणार नाही

Vyaparimitra    13-Sep-2019
|
 
 

प्रश्न: मला आकारणी वर्ष 2017-18 मध्ये धंद्यापासून रु. 8 लाख नुकसान होते. मी वेळेत आयकर पत्रक दाखल केले होते. आकारणी वर्ष 2018-19 मध्ये मला व्याजापासूनचे उत्पन्न आहे. धंदा किंवा व्यवसायापासूनचे आकारणी वर्ष 2017-18 चे पुढे ओढलेले नुकसान आकारणी वर्ष 2018-19 च्या अन्य स्त्रोतापासूनच्या (व्याजाच्या) उत्पन्नातून वजा (सेटऑफ) मिळू शकेल का?
 
उत्तर: आयकर कलम 72 च्या तरतुदीनुसार “धंदा किंवा व्यवसापासूनचे उत्पन्न” या शीर्षकाखाली येणारे नुकसान पुढील वर्षात ओढून पुढील वर्षाच्या कोणत्याही धंदा किंवा व्यवसायाच्या नफ्यातून वजा मिळू शकते. असे नुकसान पुढील 8 आकारणी वर्षांपर्यंत पुढे ओढता येते. ते पुढील वर्षातील धंदा किंवा व्यवसायापासूनच्या उत्पन्नातून वजा मिळते, म्हणजेच अन्य शीर्षकाखालील उत्पन्नातून वजा मिळणार नाही. त्यामुळे आपले आकारणी वर्ष 2017-18 चे पुढे ओढलेले धंदा किंवा व्यवसायापासूनचे नुकसान आकारणी वर्ष 2018-19 च्या अन्य स्त्रोतापासूनच्या (व्याजाच्या) उत्पन्नातून वजा मिळणार नाही. जी.व्ही.के. एअरपोर्ट डेव्हलपर्स लि. वि. आयकर अधिकारी (2018) 172 आय.टी.डी. (हैद्राबाद) या केसमध्ये ट्रायब्यूनलने या संबंधीचा निर्णय दिला आहे.