आयकर कलम 44ऄडी ची अंदाजित उत्पन्न दाखविण्याची तरतूद लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपला (एल.एल.पी.) लागू होत नाही

Vyaparimitra    13-Sep-2019
 

 
 

प्रश्न:
आमची लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (एल.एल.पी.) असून त्यात कमिशनचा व्यवसाय आहे. आम्ही आयकर कलम 44ऄडी च्या तरतुदींनुसार आयकर पत्रक दाखल करू शकतो का?
 
उत्तर: उलाढाल किंवा ढोबळ जमा रकमेच्या 8% निव्वळ नफा दाखवून पत्रक दाखल करता येते. अकौंट-पेयी चेक किंवा अकौंट-पेयी ड्राफ्ट किंवा बँकेच्या इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीमद्वारा रक्कम प्राप्त झाल्यास 6% निव्वळ नफा दाखविता येतो. ही योजना व्यक्ति, हिंदू अविभक्त कुटुंब आणि भागीदारी संस्था यांना लागू आहे. परंतु लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप या प्रकारच्या करदात्याला ही योजना लागू होत नाही. त्याचप्रमाणे कमिशन किंवा ब्रोकरेज पासून उत्पन्न मिळत असेल किंवा करदात्याचा कोणताही एजन्सी व्यवसाय असेल तर कलम 44ऄडी ची तरतूद लागू होणार नाही. आपली एल.एल.पी. आहे व त्यात एजन्सीचा व्यवसाय आहे. त्यामुळे आपण कलम 44ऄडी खाली आयकर पत्रक दाखल करू शकणार नाही.