व्यापारी मित्र तर्फे आयोजित ज्ञानसत्रासंबंधी महत्वपूर्ण माहिती

Vyaparimitra    17-Sep-2019
|
 
 
१. १९७८ पासून व्यापारी मित्र मासिकतर्फे अनेक ठिकाणी आतापर्यंत ९४ ज्ञानसत्रे संपन्न झाली आहेत आतापर्यंतची ज्ञानसत्रे संस्था,चेंबर ऑफ अँड इंडस्टीज, पंतपेढ्या रोटरिक्लब लायन्स क्लब जेसिस इत्यादीतर्फे वेगवेगळ्या गावी उदा जळगाव, लातूर,मनमाड,सांगली,कोल्हापूर.इचलकरंजी,पंढरपूर.कुडाल, मिरज अमरावती, चाळीसगाव, बीड गडहिंग्लज, परभणी, सोलापूर, धुळे, नंदुरबार, धोंडाईचा, मालेगाव, पनवेल, यवतमाळ, आंबेजोगाई, शिरूर, साक्री, नांदेड, वाडा, कराड, सातारा, उस्मानाबाद, इ. ठिकाणी, यशस्वीपणे, संपन्न झाली आहेत त्यात भाग घेतलेल्या हजारो प्रशिक्षणार्थीना ज्ञानसत्रात मिळालेल्या माहितीची प्रशंसा केली आहे. पुणे येथेही ज्ञानसत्रे भरवली जातात.

२. ज्ञानसत्र दोन दिवसाचे घेतले जाते. त्यात कारखानदार व्यापारी सहकारी सोसायट्यातील अधिकारी कर-सल्लागार दिवाणजी जमाखर्च लिहिण्याचे काम करणारे व इतर संबंधित व्यक्तीसाठी आयकर, जीसटी, व्यवसायकर इ. करविषयक कायदे, करनियोजन तसेच जमाखर्चासंबंधी माहिती दिली जाते.
 

Edit_1  H x W:  
 

३. ज्यांना आपल्या शहरात,गावी ज्ञानसत्र भारवावयाचे असेल त्यांनी पुढीलप्रमाणे व्यवस्था व प्रयत्न करणे जरुरीचे आहे. ज्ञानसत्रासाठी किमान १०० प्रशिक्षणार्थी असावेत. त्यासाठी किमान ५ ते १० उत्साही लोकांनी जिद्दीने कमीत कमी १५ ते २० दिवस भरपूर परिश्रम घेऊन ज्ञानसत्रासाठी आवेदनपत्र भरून फी गोळा करावयास पाहिजे, एकट्या एकट्याने हे कार्य चांगल्याप्रकारे होणे शक्य नाही केवळ वर्तमानपत्रात जाहिरात वाचून किंवा पत्रक वाटून ज्ञानसत्रात आपोआप लोक भाग घेत नाहीत त्यासाठी प्रत्यक्ष संपर्क साधनेच आवश्यक आहे.
 

 

४. येथून आम्ही ४/५ जण जाणे येणेचा दिवस धरून ४ दिवस काढून ज्ञानसत्रासाठी येत असतो. किमान १००/१२५ व्यापाऱ्यांना, होतकरू व्यावसायिकांना,दिवाणजी व नवीन कर सल्लागारांना ज्ञानसत्राचा फायदा मिळावा या दृष्ठीने आपल्या सर्व प्रकारच्या व्यापारी संस्था कर-सल्लागार,महाविद्यालये. कार्यकर्ते, रोटरी क्लब, जेसिस, सहकारी सोसायट्या इ.नामवंतांच्या सक्रिय सहयोग मिळविणे आवश्यक आहे.

५. ज्ञानसत्राच्या आरंभी तसेच समारोप प्रसंगी आपल्या येथील व्यापारी, यशस्वी कारखानदार वगैरे यांना निमंत्रित करावे.

६. उदघाटनाची आपल्या शहरातील व जवळपासच्या गावातील मान्यवर, ज्येष्ठ विद्वान नागरिकासही बोलवावे.
 
७. समारोपप्रसंगी आलेल्या मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते शिबिराच्या प्रशिक्षणार्थीना ज्ञानसत्रात यशस्वीपणे भाग घेतल्याबद्दल प्रमाणपत्र दिली जातात.
 

 
८. ज्ञानसत्राचे उदघाटन व समारोपाच्या वेळी फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरची व्यवस्था करणे जरुरीचे आहे म्हणजे फोटो व ज्ञानसत्राची माहिती 'व्यापारी मित्र ' मासिकात प्रसिद्ध करता येईल.
 
९. आम्हा ४/५ जणांसाठी परमिट-रूम मांसाहारी व्यवस्था नसलेल्या शुद्ध शाकाहारी लॉजमध्ये राहण्याची व्यवस्था करावी. सदरची लॉज ज्ञानसत्राच्या जागेपासून फार दूर अंतरावर व रहदारीच्या अगदी जवळपास असू नये.थोडक्यात मध्यवर्ती असावा.
१०. ज्ञानसत्राच्या एकावेळी १५०/२०० माणसे बसावयास खुच्यांची व्यवस्था असावी.तसेच लाऊड-स्पीकरची सोय करावी.
 
११. आजच्या काळात ज्ञानसत्राचे महत्व: सद्याचे करविषयक कायदे अत्यंत क्लिष्ट आहेत.दरवर्षी केव्हाही कायद्यामध्ये विविध बदल होत असतात. त्याची प्रसिद्द फारशी केली जात नाही. त्याचप्रमाणे तालुकास्तर तसेच काही मागास भागातील जिल्हे यामधील व्यापाऱ्यांना कायद्यातील महत्वपूर्ण तरतुदींची माहिती नसते. ते आपल्या कर सल्लागारांवर अवलंबून असतात. मात्र रिटर्न भरण्याच्या शेवटच्या क्षणी कर-सल्लागारांकडे गेल्यावर त्यांनाही वेळ नसल्याने ते शंका-समाधान करू शकत नाहीत. आपल्याला कायद्याची थोडीशी का होईना माहिती असली तरच आपण शंका विचारू शकाल. कायद्याच्या आज्ञानामुळे होणार त्रास.दंड व वेळप्रसंगी ज्ञान असणे. यासाठी आपल्या शहरात जेव्हा ज्ञानसत्राचे आयोजन केले जाईल त्यामध्ये भाग घेणे हे आपले एक महत्वपूर्ण कार्य आहे. एकदा या ज्ञानसत्रामध्ये भाग घेतल्यावर आपणास त्याचे महत्व लक्षात येईल आणि आपण धंद्यातील प्रत्येक भागीदार,दिवाणजी, मुले यांना यामध्ये भाग घेण्यास स्वत;हुन पाठविणार याची आम्हास खात्री आहे. मात्र याची सुरुवात करण्याची जबाबदारी आपली आहे. आम्ही आपल्या दारात संधी आणून दिली आहे. त्याचा फायदा घेणे हे आपल्याच हातात आहे

 
 
 
१२. ज्ञानसत्रासंबंधी प्रशिक्षणार्थींच्या अभिप्राय: कायद्याची माहिती अप-टू-डेट ठेवण्यासाठी २-३ वर्षानंतर परत ज्ञानसत्रात भाग घेणे लाभाचे ठरेल.प्रशिक्षणार्थ्यापैकी काहींनी आतापर्यंत ७/८ वेळा ज्ञानसत्रात भाग घेतला आहे. या ज्ञानसत्रात आजपर्यंत ज्यांनी भाग घेतला त्या सर्वानी या शिबिराचा आम्हास खूप फायदा झाला,अशी ज्ञानसत्रे दरवर्षी आयोजित करा अशी मागणी केली आहे. कायद्यासंबंधी असणारे अज्ञान दूर होऊन ज्ञानात भर पडते त्यामुळे मन निर्भय होऊन कायद्यातील तरतुदीची योग्य ती पूर्तता करता येईल. विविध गुंतवणूक,त्याचे फायदे,कायद्यातील विविध तरतुदीसंबंधी माहिती मिळाल्याने कर-नियोजन योग्यप्रकारे करता येईल.असे अनेकांनी मत दिले आहे. उत्पन्न न दडविता कायद्यातील विविध करसवलतींचा फायदा कशाप्रकारे घेता येईल. योग्य तो कर भरावा याचे उत्तम मार्गदर्शक ज्ञानसत्रात मिळते. जीसटी व अन्य तत्सम कायद्यातील क्लिस्ट तरतुदी, विविध उदाहरण, कोर्ट निर्णय याद्वारे सोप्या मराठी भाषेत समजावून दिल्या जातात. त्यामुळे कायद्याचे अज्ञान दूर होण्यास खूप मदत मिळते.तसेच कर-सल्लागरांना काय विचारावे व त्याचा फायदा कसा करून घ्यावा याबद्दल आत्मविश्वास वाटतो असा काहींना अभिप्राय दिला आहे.