फक्त लपवलेल्या उलाढालीवर दंड आकारता येतो

Vyaparimitra    05-Sep-2019
|

 
 
केसची हकीकत: करदात्याने चुकीच्या पद्धतीने इंटरेस्ट फ्री सेल्स टॅक्स (I.F.S.T.) चा क्लेम केला व सेल्फ असेसमेंट कर कमी भरला म्हणून आकारणी अधिकार्‍यांनी आकारणी करून कराची मागणी केली. तसेच तामिळनाडू जनरल सेल्स टॅक्स, 1959 चे कलम 12(3)(बी) प्रमाणे दंड आकारला. याविरुद्ध करदात्याने मद्रास हायकोर्टात रिट केले. आकारणी अधिकार्‍यांनी करदात्याच्या हिशोबाच्या वह्या मान्य केल्या आहेत. करदात्याने उलाढाल लपवली असे आकारणी अधिकार्‍यांचे म्हणणे नाही. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणास कलम 12(3)(बी) लागू होत नाही. करदात्याने उलाढाल लपवली असती तर कलम 12(3)(बी) प्रमाणे दंडाची कारवाई करण्याचा अधिकार आकारणी अधिकार्‍यास प्राप्त होतो. प्रस्तुत प्रकरणात तशी वस्तुस्थिती नाही म्हणून आकारणी अधिकार्‍यांनी लावलेला दंड हायकोर्टाने रद्द केला व करदात्याच्या बाजूने निर्णय दिला.
[श्री. कांची स्टील प्रा.लि. वि. डेप्युटी सीटीओ(2018) 54 जीएसटीआर 201 (मद्रास)]