वर्क्सकॉन्ट्रॅक्ट मध्ये वापरल्या गेलेल्या वस्तूची गृहीत विक्री होते व त्यावर कर लागतो - सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Vyaparimitra    05-Sep-2019
|

 
केसची हकीकत: करदाता पेस्ट कन्ट्रोलचे काम करतो. त्याने रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड सोबत पेस्ट कन्ट्रोलची सेवा पुरवण्याचे काम करण्यासाठी करार केला. कराराप्रमाणे सेवा पुरवताना करदाता जे केमिकल्स वापरतो ते पूर्णपणे नष्ट होतात. गुजरात व्हॅट कायद्याच्या आकारणी अधिकार्‍यांनुसार करदात्याने ग्राहकास त्या केमिकल्सची गृहीत विक्री केली आहे म्हणून त्यावर कर आकारला. यावर प्रकरण सुप्रीम कोर्टापुढे आले. वर्क्सकॉन्ट्रॅक्टचे काम पूर्ण करताना वापरण्यात आलेल्या मालाची गृहीत विक्री होते, त्यामुळे आर्टिकल 366(29ऄ)(बी) भारतीय राज्य घटनेनुसार गुजरात व्हॅट अ‍ॅक्ट, 2003 च्या तरतुदीनुसार गृहीत विक्रीवर कर आकारण्यास राज्यास अधिकार आहे. प्रस्तुत प्रकरणात पेस्ट कन्ट्रोलच्या कामात केमिकल्स वापरले जातात, त्यामुळे त्या केमिकल्सची गृहीत विक्री होते म्हणून आकारण्यात आलेला कर बरोबर आहे.
[गुजरात राज्य वि. भारत पेस्ट कन्ट्रोल (2018) 55 जीएसटीआर 99(एससी)]